Connect with us

आरोग्य

शनिवारी केस का कापू नयेत? | Why it’s not good to cut hair/nails on Saturdays in Marathi?

Published

on

असे म्हटले जाते शनिवारी नखे आणि केस कापल्याने शनीचा कोप होतो आणि तस केल्याने आपले नशीब वाईट होते, असा अंधविश्वास आपल्या हिंदूं धर्मामध्ये प्रचलित आहे. पण हे खर्च सत्य आहे का?

जुन्या काळात गांवागांवामध्ये केवळ एक व भारित भारी दोन न्हावी असायचे. अशा वेळी या न्हाव्यांना एकही सुट्टी भेटत नसे. म्हणून त्याकाळी केला न्हाव्याने असा गैरसमज गावामध्ये पसरवला कि जर का तुम्ही शनिवारी केस कापत असाल तर शनिदेव तुमच्या वर कोपेल आणि तुमचं काहीच चांगले होणार नाही. जेणे करून त्याला एक दिवस तरी सुट्टी घेता येईल. आणि मग हि अफवा गांवागांमधून शहरामध्ये सुद्धा पसरली. त्यामुळे आजही कित्तेक सलून शनिवारी बंद ठेवले जातात. त्यामुळे माझ्या मते हि फक्त एक अफवा आहे तुम्ही कोणताही दिवशी केस कापू शकता अशाने कोणताही कोप तुमच्यावर होणार नाही.

आता तुम्हाला मी शनिवारी केस कापायचे फायदे सांगतो.

पहिला फायदा म्हणजे शनिवारी सलून मध्ये जास्त गर्दी नसते त्यामुळे तुम्ही पटकन तुमचे केस कापून घेऊन आपल्या कमला जाऊ शकता.

दुसरा फायदा म्हणजे शनिवारी गर्दी कमी असल्याने न्हावी फ्रेश असतो, आणि तो कंटाळून जास्त घाई करत नाही व त्यामुळे तुमचे केस चांगले कापले जातात.

तिसरा फायदा म्हणजे, न्हावी हा असा व्यक्ती असतो ज्याला आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, कारण त्याच्याकडे रोज कित्तेक लोक येऊन केस कापता कापता गप्पा मारून जातात. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती अगदी सहज तुम्ही त्यांच्या कडून काढून घेऊ शकता. 

 

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *